साहित्यः 1 कलिंगड, अर्धा चमचा वेलची पावडर, आवश्यकतेनुसार बदाम आणि काजूचे तुकडे, चवीनुसार साखर, अर्धा लीटर दूध
कृतीः कलिंगडचे वरील आवरण काढून त्यातील वाटीभर लाल गर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. त्याच्या पाठीमागील पांढरे साल तोही वाटीभर काढून खिसणीवर खिसून घ्यावा. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत दूध गरम करण्यास ठेवावे. दुधाला उकळी आली की आच मंद करावी. या दुधात आधी किसलेला पांढरा भाग घालावा आणि एकसारखे ढवळत राहावे. साधारणपणे दोन ते तीन मिनिटे गरम करून मिश्रण शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात कलिंगडचा लाल गर, बदाम आणि काजूचे तुकडे टाकून मिश्रण मिक्स करावे. त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे. मिश्रण आटत आले की त्यात साखर टाकून मिश्रण एकसारखे ढवळत साखर विरघळवून घ्यावी. शेवटी वेलची पावडर टाकावी आणि मिश्रण पुन्हा पाच मिनिटे शिजवावे. आता तयार खीर गार करून बदामने सजवून खाण्यास द्या.