वार्ताहर/ कारदगा
येथील डी. एस. नाडगे हायस्कूलच्या शिक्षिका कल्पना शंकर रायजाधव यांना दि भारत स्काऊट्स व गाईड्स बेळगाव कर्नाटक यांच्यावतीने स्काऊट्स व गाईड्स सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रायजाधव या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर क्रीडा, साहित्यिक ज्ञानही मिळावे यासाठी नेहमी धडपडत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चिक्कोडी येथे 5 रोजी झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ, डाएट कॉलेजचे प्राचार्य एम. पी. जिरगिहाळ, क्षेत्र शिक्षणाधिकारी बी. ए. मेकनमर्डी, उपनिर्देशक गजानन मन्नीकेरी आदी मान्यवरांच्या हस्ते रायजाधव यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.