ब्राझीलच्या अध्यक्षांनी उधळली मुक्ताफळे : लस घेण्यास दर्शविला नकार
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचा कोरोना लसीला विरोध कायम आहे. अमरिकेच कंपनी फायजर आणि त्याची जर्मन भागीदार बायोएनटेकच्या लसीने लोक मगर किंवा दाढीयुक्त महिलांमध्ये रुपांतरित होऊ शकतात, असा बाळबोध संशय व्यक्त केला आहे.
फायजरने करारात कुठल्याही दुष्परिणामासाठी जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. जर माणूस मगरीत बदलला तर ही संबंधिताची समस्या असल्याचे बोल्सोनारो यांनी म्हटले आहे. लसीमुळे तुम्ही सुपरह्यूमन झाल्यास, महिलांना दाढी आल्यास किंवा पुरुष महिलांच्या आवाजात बोलू लागल्यास याची जबाबदारी स्वीकारणार नसल्याची मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत.
लस मोफत, पण अनिवार्य नाही
ब्राझीलमध्ये लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करताना बोल्सोनारो यांनी लस मोफत असली तरीही अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. लसीला ब्राझीलच्या नियामकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर मला वगळून सर्वांना लस मिळणार आहे. ही लस आपण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.