प्रतिनिधी /केपे
डा?क्टर उदय सुभाष सावंत देसाई यांच्या कुडचडे येथे सुरू करण्यात आलेल्या बालचिकित्सालयाचे उद्घाटन कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व कायदामंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते झाले.
यावेळी कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डा?. जास्मिन ब्रागांझा, अन्य नगरसेवक, नागरिक, फार्मासिस्ट, डा?क्टर व इतर मान्यवर उपस्थित होते कुडचडे येथे सुरू करण्यात आलेले हे पहिलेच बाल चिकित्सालय आहे. या वेळी त्यांना सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
या परिसरातील लोकांना चांगली सेवा देवून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे कार्य करण्याचे आवाहन मंत्री काब्राल यांनी केले. सदर दवाखाना कदंब बसस्टॅण्ड जवळील ’ओमकार’ इमारती मध्ये स्थित आहे.
डा. उदय देसाई हे या परिसरात लोकप्रिय व सेवाभावी डा?क्टर असून त्यांनी कांही काळ कुडचडे व केपे आरोग्य केंद्रात बालरोग चिकित्सक म्हणून काम केले आहे. गेली दोन वर्षे ते मुंबई येथील प्रसिद्ध लीलावती इस्पितळात बालरोग चिकित्सक म्हणून कार्यरत होते. ऍड.सुभाष देसाई यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.