कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड औद्योगिक वसाहतमधील बऱ्याच वर्षापासून रखडलेला सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्प तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. याबाबतचा निर्णय नुकताच औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सदरचा प्रकल्प गतीमान करण्यासाठी कृष्णाव्हॅली चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यामुळे अखेर कृष्णाव्हॅली चेंबरच्या अथक प्रयत्नाला यश आले आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र भोसले व कृष्णाव्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.