वार्ताहर/ रामनगर
गोव्यातून कर्नाटक व इतर राज्यात गोवा बनावटीची दारू अनेक मार्गाने येत आहे. काही तस्करी करणाऱया वाहनांद्वारे तर काही मालवाहू रेल्वेद्वारे तसेच काही चालकच दारू आणत आहेत. त्यांच्यावर अबकारी खात्याने करडी नजर ठेवली आहे. शुक्रवारी 1 मे ला सायंकाळी सव्वासहा दरम्यान कॅसलरॉक येथील रेल्वे मार्गाच्या शेजारी दोन कॅनमध्ये हुराक दारू 40 लिटर अबकारी खात्याला निदर्शनास आली. सदर दारूसाठा दांडेली अबकारी उपनिरीक्षक मंजुकुमार नायक, कर्मचारी संतोष सुबन्नावर, आनंद एम., सिद्धराम कुरण्णावर आदींनी जप्त केला.