ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या संकटामुळे कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी घोषणा केली आहे की यंदा ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेणार आहेत.
तसेच पीएम केअर फंडासाठी 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. 2019 या आर्थिक वर्षात उदय कोटक यांचा बेसिक पगार 27 लाख रुपये होता. याआधी कोटक महिंद्रा ग्रुप ने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. तर स्वतः उदय कोटक यांनी वैयक्तिकरित्या या फंडासाठी पंचवीस कोटी रुपये दिले आहेत.
त्याचबरोबर, कोटक महिंद्रा बँक आणि उदय कोटक यांनी एकत्रित केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये 60 कोटी जमा केले आहेत. पीएम केअर निधीमध्ये उदय कोटक यांनी वैयक्तिकरित्या 25 कोटी, कोटक महिंद्रा बँक मे 25 कोटी दान केले आहेत.
दरम्यान, कोटक यांच्या टॉप लीडरशिप टीमने देखील एकजूट होऊन आपल्या पगारात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात आर्थिक वर्ष 2019 साठी असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.