वारणानगर / प्रतिनिधी
भारतीय सैन्यदलाने घेतलेल्या स्पर्धा परिक्षेतून कॅप्टन अभिजीत राजेद्र बिचकर याची लष्कराच्या एव्हिएशन विभागात हेलीकॅप्टरच्या पायलट पदी निवड झाली.
लष्कराच्या तोफखाना विभागात अभिजीत बिचकर हे कॅप्टनपदावर सद्या कार्यरत आहेत. कोडोली (ता. पन्हाळा) येथील भाई राजेंद्र बिचकर आणि सौ वैशाली राजेंद्र बिचकर यांचे सुपुत्र कॅप्टन अभिजित हे जुलैमध्ये पायलट पदाच्या विशेष प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी एक वर्षासाठी आर्मीच्या प्रशिक्षण संस्थेत हजर होणार आहेत.