गॅस्टिक भाज्या नुकसानकारक : श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या व्यक्तींना गॅस आणि ब्लोटिंगमुळे अधिक त्रास होऊ शकतो. कोबी, ब्रोकोली, मूळा आणि फ्लॉवर या भाज्या पोषक तत्त्वांनी भरलेल्या असतात आणि फायबरही खूप असते. परंतु त्याच्या सेवनाने पोटात गॅस होत असेल तर त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
सॉफ्ट ड्रिंकला नकार द्या : कोल्ड ड्रिंक्समध्ये कोणतेही पोषक तत्त्व नसते. त्यात केवळ साखर आणि कॅलरी असतात. त्याचे प्राशन केल्याने वजन वाढते. तसेच यातील कार्बन डाय ऑक्साईडमुळे श्वसनप्रक्रियेवरही प्रतिकूल परिणाम होतात.
थंड पाणी पिऊ नका : उन्हाळ्यात थंड पाणी सर्वांनाच हवे असते. परंतु हेच थंडगार पाणी श्वसन प्रक्रियेला बाधा आणू शकते. फ्रिजचे थंड पाणी पिल्याने घसा आकुंचन पावतो आणि त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो.
मीठ कमी खा : चटपटीत जेवण, आहार हा सर्वांनाच आवडतो. मात्र अधिक मीठ हे फुफ्फुसाला मारक ठरतात, हे लक्षात घेतले पाहिजे. मीठाने वॉटर रिटेंशनची समस्या निर्माण होऊ शकते आणि परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणूनच मिठाचे सेवन कमी ठेवायला हवे.
तेलकट पदार्थ टाळा : तळलेल्या पदार्थांच्या सेवनाने ऍसिडिटी होते. त्यामुळे काही वेळा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तेलकट पदार्थामुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्यामुळे फुफ्फुसावर परिणाम होतो. तेलकट पदार्थ हेल्दी नसतात. ते कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात आणि हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता राहते.
दुग्धजन्य पदार्थः दूध नेहमीच शरिराला पोषण देते. मात्र यामध्ये कॅसोमॉर्फिन तत्त्व असतात. ते आतडय़ाला हानीकारक ठरु शकतात. फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांसाठी डेअरी उत्पादने अनुकूल ठरत नाहीत. कारण हे पदार्थ आजाराची लक्षणे वाढवण्यास हातभार लावतात. त्यामुळे कोरोनाकाळात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.