प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण रात्री सीपीआरमध्ये आला..तेथून सुरू झालेली ड्युटी.. मॉनिटरींग, व्हिजिट करताना झालेला अपघात, तरीही घरातून बजावलेले कर्तव्य.. कोरोनातील कंटेन्मेंट झोन.. तेथे असलेली वस्तुस्थिती व्हिडीओद्वारे प्रशासनाला देणे..त्यातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांतील त्रुटी दूर करण्यास प्राधान्य.. राज्य आणि जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठांत समन्वय साधणारी.. लढवय्यी दुर्गा.. म्हणजे डॉ. हर्षला वेदक
डॉ. हर्षला वेदक मुळच्या मुंबईच्या. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. तेथेच त्यांनी वैद्यकीय शाखेची पदवी घेतली. मिरज मेडीकल कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. गेली 25 वर्षे त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रारंभी वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यात जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी, सहायक संचालक कुष्ठरोग विभाग, सहायक संचालक हिवताप विभाग आदी जबाबदाऱया त्यांनी पार पाडल्या आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागात त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. 2 वर्षे त्या `सीपीआर’मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहÎसंपर्क) म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात संनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी आहे.
जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे नगरपालिकांचा आरोग्य विभाग आहे. कोरोना काळात जिल्हा शल्य चिकित्सक नोडल अधिकारी झाले. पण सप्टेंबरअखेर यातील 90 टक्के जबाबदारी डॉ. वेदक यांनीच पूर्ण केली आहे. बाहÎसंपर्काची जबाबदारी असल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जावे लागत होते. सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीपर्यत अगदी घरी गेल्यावरील संपर्क सुरूच.. कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना कंटेनमेंट, कोअर झोन झाले.. त्याची पाहणी करताना स्थानिक लोक मास्क वापरतात का, दक्षता घेतात का, सर्वेक्षण होतेय का, यावरही त्यांनी लक्ष ठेवले. घटनास्थळी बिनधास्त वावरणाऱयांची छायाचित्रे. व्हिडीओ त्यांनी थेट वरिष्ठांना पाठवले अन् प्रतिबंधात्मक उपाययोजनांतील त्रुटीही दाखवून दिल्या. प्रसंगी घटनास्थळीही उपाययोजनांची कडक अमंलबजावणी केली.
जिल्ह्यातील 9 नगरपालिका.. त्यातही इचलकरंजीतील कम्युनिटी स्प्रेड.. वाढती रूग्णसंख्या.. कोरोना बळी.. अन् ती नियंत्रणात येण्यासाठी प्रत्यक्षदर्शी डॉ. वेदक यांनी केलेले प्रयत्न..त्यांना स्टाफचे मिळालेले सहकार्यही आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये आरोग्य सेतू अॅपचा वापर होतोय का, याचीही त्यांनी माहिती घेतली. कोरोना नियंत्रणात आला असला तरी गेल्या महिनाभरात माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतून आरोग्य तपासणी.. त्याचे सर्वेक्षण याचीही नोंद त्यांनी घेतली.
डीओटी, हेल्थ, कोरोना केअर सेंटर उभारणी अन् त्यानंतरही तेथे असलेल्या त्रुटी दूर करण्याला डॉ. वेदक यांनी प्राधान्य दिले. एकीकडे ही प्रत्यक्ष व्हिजिटची जबाबदारी अन् दुसरीकडे प्रशासनातील वरिष्ठांमध्ये समन्वय, राज्यस्तरावरील मार्गदर्शक सुचनांची माहिती वरिष्ठांसह सर्व विभागांना देण्याची कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. कार्यालयीन आणि प्रत्यक्ष फिल्डवर अशी द्विस्तरावर कोरोना काळात लढा देणारी दुर्गा म्हणून डॉ. हर्षला वेदक यांच्या कामगिरीची नोंद समाजाने नक्कीच घेतली आहे.