ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. शुक्रवारी देशात 779 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा 35 हजार 747 एवढा आहे.
अमेरिकेत कोरोना कोरोनाबळींची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत 47 लाख 06 हजार 059 रुग्ण आढळले. त्यामधील 1 लाख 56 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 26 लाख 66 हजार 298 रुग्ण आढळले असून, त्यामधील 92 हजार 568 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर मेक्सिकोत कोरोना बळींची संख्या जास्त आहे. मेक्सिकोत 4 लाख 24 हजार 637 रुग्ण आढळले. त्यामधील 46 हजार 688 रुग्ण दगावले आहेत.
इंग्लंडमध्ये 3 लाख 03 हजार 181 कोरोना रुग्ण आढळले. त्यामधील 46 हजार 141 रुग्ण मरण पावले. तर भारतात आतापर्यंत 17 लाख 03 हजार 301 रुग्ण आढळले असून, 36 हजार 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 19 हजार 122 मृत्यू हे एका जुलै महिन्यातील आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.