रोगमुक्तीचे प्रमाण जवळपास 75 टक्के, मृत्यूदरात आणखी घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या 16 दिवसांमध्ये देशात कोरोना रूग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक वाढली आहे. सध्या एकंदर रूग्णसंख्या 30 लाख 44 हजार 940 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांची संख्या 7 लाख 7 हजार 668 इतकी आहे. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूच्या प्रमाणात आणखी घट होऊन ते 1.86 टक्क्यांवर पोहचले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ते 2 टक्क्यांहून अधिक होते, अशी माहिती देण्यात आली.
शनिवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये 69 हजार 239 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 912 जणांचा मृत्यू होऊन एकंदर संख्या 56 हजार 706 इतकी झाली. 912 नव्या मृत्यूंपैकी 297 महाराष्ट्रातील आहेत. रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असून आता ते 74.90 टक्क्यांवर पोहचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 64 हजाराहूऊन अधिक रूग्ण कोरोनामुक्त झालेले असल्याची माहितीही देण्यात आली.