ब्रिटनच्या विद्यापीठाकडून 5 हजारांहून अधिक औषधांवर संशोधन
वृत्तसंस्था/ लंडन
कोरोनाचे संक्रमण रोखणे आणि त्याच्या उपचारावरील औषध तयार करण्याचा प्रयत्न जगभरात केला जात आहे. याचदरम्यान लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टीटय़ूट आणि डंडी युनिव्हर्सिटीने मिळून 5 हजारांहून अधिक औषधे आणि मेडिकलशी संबंधित रसायनांवर संशोधन केले आहे.
संशोधनात कोविड-19 विषाणूच्या संसर्गावरील उपचारात वापरता येणारी 15 औषधे आढळून आली आहेत. या औषधांच्या मदतीने संसर्गाची लक्षणे कमी करण्यासह रिकव्हरी वेगाने वाढविली जाऊ शकते. या औषधांमुळे ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसह कोरोनाशी झगडणाऱया रुग्णांना लाभ मिळणार आहे. अशा रुग्णांवर लस अधिक प्रभावी ठरत नाही.
7 इंजाइमवर परीक्षण
संशोधनादरम्यान सर्व 5 हजार औषधांचे कोरोनाच्या 7 विविध एंजाइमवर परीक्षण करण्यात आले आहे. कोरोनावरील उपचाराकरता ओळख पटविण्यात आलेल्या औषधांपैकी काहींचा वापर अन्य आजारांवरील उपचाराकरता केला जात आहे. यापैकीच एक लोमेगुएट्रिबचा वापर मेलेनोमा (एकप्रकारचा त्वचेचा कर्करोग)करता केला जातो. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. दुसऱया औषधाचे नाव सुरामिन आहे. याचा वापर आफ्रिकेत आढळून येणारा निद्रा आजार आणि रिव्हर ब्लाइंडनेसमध्ये (एकप्रकारचे अंधत्व) केला जातो.
रेमडेसिविरसोबत मिळून परीक्षण आम्ही एक केमिकल टूलबॉक्स तयार केला असून यामुळे कोरोनावरील उपचारात मदत मिळणार आहे. जगभरातील संशोधकांचे यावर लक्ष दिले जाईल आणि याचे मोठय़ा प्रमाणावर परीक्षण करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. 15 मॉलिक्यूल्सची चाचणी रेमडेसिविरसोबत करण्यात आली आहे. या औषधाला सध्या देखील कोरोनाबाधितांच्या उपचारात वापरले जात आहे. संशोधक आता औषधांना विविध प्रकारच्या पडताळून पाहण्याचे नियोजन करत आहेत अशी माहिती संशोधकाच्या पथकाचे सदस्य जॉन डिफ्ली यांनी दिली आहे.