वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचा पुढील दौऱयात होणारा भारत दौरा आता स्थगित झाला आहे. पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागाराने मंगळवारी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान बेनेट यांचा भारत दौरा 3-5 एप्रिलदरम्यान होणार होता. भारत दौऱयापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारीच त्यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 50 वर्षीय बेनेट यांचा भारत दौरा कोरोना संक्रमणामुळे रद्द करावा लागला आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने मागील आठवडय़ातच बेनेट यांच्या दौऱयाची घोषणा केली होती.
पंतप्रधानांची तब्येत बरी असून ते घरातूनच कामकाज सांभाळतील असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. इस्रायलमध्ये ओमिक्रॉन बीए.2 स्ट्रेनमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.