वार्ताहर / कबनूर
येथील यशोलक्ष्मी परिसरात नव्याने कोरोना संसर्ग रोगाचे आठ रुग्ण आढळून आले दोन जणांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कबनूर तालुका हातकणंगले येथे सुमारे आठ महिन्याचा कालावधीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोल्हापूर रोडवरील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयानजीक असलेल्या यशोलक्ष्मी कॉलनी परिसरात असलेल्या एकाच घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण बनले आहे.
एकाच घरातील ८ जणांपैकी दोन जणांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर उर्वरित सहा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्या घरातील लहान मुलांना स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायतकडून मिळाली.
या आठ महिन्यापूर्वी गावामध्ये ३२० कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्ण संख्या ३३१ वर जाऊन पोहोचली आहे. ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.