प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोविशिल्ड लस कमी असल्याने 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. रविवारी लसीअभावी अनेक केंद्रे बंद राहिली. पण सायंकाळी 27 हजार डोस जिल्ह्यात दाखल झाले, त्यामुळे सोमवारी 45 वर्षावरील लाभार्थ्यांना लसीचा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. पण त्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना आणखी चार दिवस पुरेल इतकी लस उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी लिंक ओपन होताच नोंदणी केल्यास ज्या, त्या दिवशी त्यांना लस मिळणार आहे. यापुर्वी नोंदणी पेलेल्यांना पुनर्नोंदणी आवश्यक आहे. शहरातील विक्रमनगर येथील लसीकरण केंद्रांवर रविवारी नोंदणी केलेल्यांना लस देण्यात आली. दरम्यान, सायंकाळी जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे 27 हजार डोस दाखल झाले आहेत. त्यामुळे सोमवारी विविध केंद्रांवर लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.