उञे/ वार्ताहर
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिर परिसरात काल सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दोन हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उत्रेतील गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम मंदिरात राबवला. या अनोखा उपक्रमात गावकरीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.