वार्ताहर / बांबवडे
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अथणी शुगर्सच्या फाटयावर असणाऱ्या पुलावरून मलकापूरच्या दिशेने येणारा बॉक्साइटचा आयशर ट्रक पलटी झाला तर त्याच्या मागे असणाऱ्या रीक्षाला मागून येणाऱ्या कमांडरने रीक्षा व कारला धडक दिली.
तिन्ही वाहनांच्या धडकेत रीक्षा ड्रायव्हर व कारमधील एक महिला जखमी झाली. अपघाताची नोंद उशिरापर्यंत झाली नव्हती. याबाबत अधिक माहीती अशी आयशर ट्रक क्रमांक के ए 28 डी 1035 हा कोल्हापूरच्या विशेने जात असताना बांबवडे येथील अथणी शुगर्सच्या वळणावर आला असता वेगावर नियंत्रण न राहील्याने पुलाचा कठडा तोडून पलटी झाला तर मागून येणारी रिक्षाला त्याच्या मागून येणाऱ्या कमांडर जीपने क्र. एम एच ०९ एबी ९५५३ व समोरून कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी कार क्र एम एच o8 ए एन 883० ला धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन रीक्षा ड्रायव्हर रंगराव गणपती तळप वय ५५ वर्ष तर कारमधील शाारद जितेंद्र जैन वय वर्ष ४० या जखमी झाल्याा. यामध्ये चारही वाहनांचे नुकसान झाले.अपघाताची नोंद उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.