कोल्हापूर / प्रतिनिधी
शहरातील उमेदपूरी – कनाननगर रस्त्यावरुन पायी चालत जात असलेल्या एका विवाहितेची चेन स्नॅचिंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सौ. लक्ष्मी भिवा सुतार ( वय ४०, रा. सोनाबाई चौक, कनाननगर ) या विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, सौ. लक्ष्मी सुतार ही विवाहिता बाजारात गेल्या होत्या. खरेदी करून त्या उमेदपूरी – कनाननगर रस्त्यावरुन पायी घराकडे जात होत्या. यादरम्यान रस्त्यावरील सार्वजनिक स्वच्छता गृहानजीक या विवाहितेच्या पाठी मागून धूम स्टाईलने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरील युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि बोरमाळ हिसकावून घेवून पोबारा केला. या लुटमारीचा गुन्हा शाहुपूरी पोलिसात दाखल झाला आहे.