निगमसाठी मंजूर झालेला निधी देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
मराठा निगमकरिता जाहीर करण्यात आलेले 50 कोटी तसेच 2021-22 सालचे 50 कोटी रुपये तातडीने द्यावेत. याचबरोबर सदाशिवनगर येथील 22 गुंठे जागा सरकारी दराने निगमकरिता द्यावी, अशी मागणी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेळगावतर्फे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
आहे.
बेळगाव जिह्यासह उत्तर कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात मराठा समाज आहे. या समाजाच्या विकासासाठी जो निधी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे, तो निधी तातडीने द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री जगदीश शेट्टर, मंगला अंगडी, मंत्री शशिकला ज्वोल्ले यांच्यासह इतर मंत्री व आमदार उपस्थित होते.
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे महानगर अध्यक्ष ऍड. ए. एम. पाटील, ऍड. भुजंगराव बिळगोजी, ऍड. नारायण खणगावकर, ऍड. श्रीकांत पवार, ऍड. अमर पाटील, संजय भोसले, दयानंद गुर्जर, एम. डी. कणबर्गी, मुंगुर्डेकर, श्रीकांत थोरवत यांच्यासह मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.