मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये खाद्य प्रक्रिया उद्योगामध्ये एफडीआय अर्थात थेट विदेशी गुंतवणूक 57 टक्के इतकी घटली असल्याची माहिती मिळाली आहे. सदरची गुंतवणूक 2 हजार 926 कोटी रुपयांवर राहिली आहे. खाद्य प्रक्रिया उद्योग खात्याचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी यासंबंधीची माहिती नुकतीच लोकसभेत दिली. सरकारच्या किंवा रिझर्व्ह बँकेच्या परवानगीविना थेट 100 टक्के इतकी गुंतवणूक सदरच्या क्षेत्रात करण्याची मुभा देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एफडीआय 393.4 दशलक्ष डॉलर्सची झाली असून मागच्या आर्थिक वर्षात ती 904.7 दशलक्ष डॉलर्स इतकी होती.
Previous Articleइस्रायलमध्ये लसीचा तिसरा डोस मंजूर
Next Article नैसर्गिक आपत्तींचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.