प्रतिनिधी / विटा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती आली आहे. तालुक्यातील निवडणुक असणाऱ्या तेरा पैकी सात ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 35 जणांनी सोमवारी 35 अर्ज दाखल केले. सोमवारी प्रामुख्याने नागेवाडी, खांबळे(भा.), पोसेवाडी, मेंगाणवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती आली आहे. सोमवारी सात ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 35 जणांनी सोमवारी 35 अर्ज दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने नागेवाडी ग्रामपंचायतीसाठी आठ, खांबळे(भा.) ग्रामपंचायतीसाठी 6, पोसेवाडी 5, मेंगाणवाडी 10, माहुली 2, पारे 1 आणि मंगरूळ ग्रामपंचायतीच्या तीन उमेदवारांनी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
दरम्यान तालुक्यातील काही गावांत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र त्याचवेळी काहींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांना खो बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत.