प्रतिनिधी/कोल्हापूर
कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये वारंवार गांजा व मोबाईल सापडण्याच्या घटना घडत आहेत. जेलच्या आत घडणाऱ्या घटनांची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे. स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवण्याच्या बाबत पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती नूतन कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी दिली.
कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून येथील कामकाज करू, अशी ग्वाही नूतन कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शुक्रवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना इंदुरकर म्हणाले, या कारागृहात कर्मचारीवर्ग कमी आहे. याची माहिती घेण्याचे काम सध्या करीत आहे. येथील कामकाज कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून मी करणार आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली तशी घटना घडू नये याकरिता आतील बंदोबस्त जेल प्रशासनाने पाहायचा आहे. तर जेल बाहेरील बंदोबस्त पोलीस प्रशासनाने पाहायचा आहे. याबाबत दीक्षित समितीने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार बाहेरील बंदोबस्त हा ज्याच्या पोलीस स्टेशनचा विषय आहे. रोज रात्री बाहेरून गस्त घालने हे काम जिल्हा पोलिस प्रशासनाचे आहे. या गोष्टीची नोंद रजिस्टरमध्ये करणे ही त्यांची जबाबदारी आहे. यासोबतच कळंबा कारागृह आतील रुग्णालयाचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर बोलणी करून त्यासंबंधी निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.
इंदुरीकर हे मूळचे नागपूर येथील असून 29 वर्षापूर्वी त्यांनी करून प्रशासनात तुरूंग निरीक्षक या पदावर कामाला सुरुवात केली. त्यानंतर नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, मुंबई, परभणी आणि येरवडा पुणे येथे त्यांनी उपअधीक्षक म्हणून काम केले आहे.
Next Article भारतीय जनता पार्टी युवती कार्यकारणी जाहीर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.