गुवाहाटी
गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा व विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे देण्यात आल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार पूर्वेकडील मुख्य विमानतळ विकास आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेस सुरुवात केल्यानंतर भारतीय एएआयचे विमानतळ संचालक रमेश कुमार यांनी या संदर्भात निर्णय दिला आहे. 50 वर्षांपेक्षा अधिकच्या काळासाठी खासगीकरणाची घोषणा केली आहे. अन्य विमानतळांमध्ये अहमदाबाद, लखनऊ, मेंगलूर, जयपूर आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश राहिला आहे.
अदानी एन्टरप्राईजेसची बोलीत बाजी
प्रामुख्याने विमानतळाची देखभाल व ते चालविण्यासाठी बोली लावण्यात आली. त्यामध्ये अदानी समूहाने बोलीत बाजी मारल्याचे पहावयास मिळाले आहे. यासंदर्भात अदानी एन्टरप्राईजेसने 19 जानेवारी रोजी एक करार केला होता.