वारणानगर / प्रतिनिधी
गोकुळ प्रमाणेच वारणेच्या दुध उत्पादकांना बीनव्याजी कर्ज द्यावे. अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व राज्याचे ग्रामीण विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना विजयसिंह जाधव दिलेल्या निवेदनात कोल्हापूर जिल्हा सह. मध्य. बँकेच्यावतीने गोकुळ दुध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे.
याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरीऱ्यांच्या वतीने विजयसिंह जाधव यानी बँकेचे आभार मानले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातच श्री.वारणा सह.दूध उत्पादक संघ, वारणानगर आहे. या दूध संघाचेही कोल्हापूर जिल्हा हेच कार्यक्षेत्र आहे.
आपल्या जिल्हा मध्य. बँकेच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे बीन व्याजी कर्ज वारणा दूध संघाच्यादूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दिले जावे अशी मागणी जेष्ठ नेते विजयसिंह जाधव यानी मंत्री मुश्रीफांना दिलेल्या निवेदनात केली आहे.