प्रतिनिधी / बेळगाव
केएलएस संस्थेच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बेळगावमध्ये प्रथम सेमीस्टरच्या विद्यार्थ्यांचा परिचयात्मक कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्रॅम) के. के. वेणुगोपाल सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून गोगटे कॉलेजचे माजी प्राचार्य व राणी चन्नम्मा विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ. जे. जी. नाईक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. एच. वीरापूर होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. दीपा तंगणकर यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजकडून मिळणाऱया अनेक सुविधांवर आधारित पीपीटी सादर करून केली. प्रा. संध्या जोशी यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नाईक यांनी आपल्या भाषणात बी. कॉम. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील संधींबाबत सांगितले. मेहनतीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मोबाईलला कसे व किती हाताळावे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वीरापूर यांनी विद्यार्थ्यांना संधीचे सोने करून भविष्य उज्ज्वल करण्याचे सांगितले. प्रा. वृषाली पाटील यांनी आभार मानले. सभास्थानी आयक्मयूएसी समन्वयक उपप्राचार्य गॅमानाईक एच., एनएएसी समन्वयक डॉ. दत्ता कामकर, कॉमर्स विभागाध्यक्ष डॉ. एम. एल. लमाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अश्विनी नाईक आणि प्रा. श्यामला पाटील यांनी केले.