प्रतिनिधी / पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या नव्या कार्यकारिणीने नुकतचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मंडळातर्फे राज्यात प्रथम काढलेल्या बालांगण या प्रातिनिधीक बालकविता संग्रह प्रकाशन करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या नव्या कार्यकारिणीचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाह सुहास बेळेकर, चित्रा क्षीरसागर, कोषाध्यक्ष राजमोहन शेटये, गुरुनाथ नाईक, दशरथ परब, लीना पेडणेकर, हेमंत खांडेपारकर, प्रकाश तळवडेकर, आदिती पणजीकर यांची उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर आणि अन्य पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री सावंत यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. कार्यवाह चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.