बहुमतासाठी 13 चा आकडा गरजेचा, यंदा जोर लावूनही भाजपाचे प्रयत्न अपुरे पडण्याचे संकेत
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेसाठीच्या 25 प्रभागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज घोषित होणाऱया निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप पुरस्कृत व्हायब्रंट मडगाव आणि गोवा फॉरवर्ड व काँग्रेस आघाडी यांच्यात मुख्य लढत झाली असली, तरी मागील वेळच्या प्रमाणे यंदाही काँग्रेस व गोवा फॉरवर्ड ही आघाडी सत्तेसाठी आवश्यक 13 चा आकडा सहज पार करेल असे प्राथमिक संकेत मिळत असल्याने यंदा मोठा जोर लावूनही मडगाव पालिकेवर भगवा फडकविण्याचे भाजपाचे प्रयत्न अपुरे पडण्याची चिन्हे एकंदर राजकीय पंडितांच्या विश्लेषणातून दिसून येत आहे. भाजप नेत्यांची देहबोली पाहिल्यास त्यांना आवश्यक 13 चा आकडा मिळणे शक्मय नसल्याचे कळून चुकल्याचे दिसून येत आहे
भाजपला जास्तीत जास्त 5 ते 7 जागा मिळण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. प्रभाग 1 ते 5 या सलग प्रभागांत फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारांचे पारडे किंचित वर असल्याचे राजकीय पंडित सांगताना आढळत होते. मात्र प्रभाग 2 मध्ये व्हायब्रंट मडगावचे कालिदास नाईक यांनी फातोर्डा फॉरवर्डचे उमेदवार जॉनी क्रास्टो यांना चांगली टक्कर दिल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या प्रभागातील निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. प्रभाग 1, 3, 4 व 5 मध्ये फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारांचा वरचष्मा राहण्याचे संकेत मिळत आहेत. प्रभाग 6 मध्ये सदानंद नाईक व प्रवीण नाईक यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित होती. ती तशीच झाल्याने या प्रभागाच्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. प्रभाग 7 मध्ये कित्येक उमेदवार असून माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, फातोर्डा फॉरवर्डचे किस्तोदियो डायस व व्हायबंटच्या मिलाग्रिना गोम्स या रिंगणात असल्याने येथे कोण बाजी मारेल यासंदर्भात उत्सुकता वाढली आहे.
प्रभाग 8 मध्ये व्हायब्रंटचे कामिलो बार्रेटो व फातोर्डा फॉरवर्डचे मिलाग्र नोरोन्हा यांच्यात असलेल्या लढतीत नोरोन्हा यांचा किंचित वरचष्मा दिसून येतो. प्रभाग 9 मध्ये कित्येक उमेदवार असून फातोर्डा फॉरवर्डचे रवींद्र नाईक, व्हायबंटच्या नर्मदा कुंडईकर व माजी नगरसेवक रामदास हजारे यांच्यात ही टक्कर असल्याचे दिसून येते. प्रभाग 10 मध्ये आधी फातोर्डा फॉरवर्डचे वितोरिन त्रावासो बाजी मारतील असे सांगण्यात येत होते, तर आता व्हायबंटच्या वासुदेव कुंडईकर यांनी त्यांना चांगली लढत दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रभाग 1?1 मध्ये फातोर्डा फॉरवर्डच्या राजू नाईक यांना व्हायबंटच्या जया आमोणकर यांचे आव्हान राहिलेले आहे. मावळते नगरसेवक आंजेलिस पेरेरा हेही रिंगणात असल्याने येथील निकाल आश्चर्यकारक लागण्याची चिन्हे आहेत.
मडगाव मतदारसंघातही अटीतटीच्या लढती
मडगाव मतदारसंघातील 11 प्रभागांमध्ये भाजप व काँग्रेसचे मॉडेल मडगाव यांच्यात लढती असून प्रभाग 12 मध्ये शर्मद रायतूरकर व सगुण नायक यांच्यात अटीतटीची लढत आहे. त्यात कोण बाजी मारेल याकडे सर्व मडगाववासियांचे लक्ष आहे. 13 मध्ये डॉरिस टेक्सेरा व डॉ. सुशांता कुडतरकर यांच्यातील लढतीतील विजय निसटत्या मताधिक्याने असेल असे सांगण्यात येते. प्रभाग 14 मध्ये व्हायबंटच्या डॉ. रोनाली आजगावकर व मॉडेल मडगावच्या सुलक्षा जामुनी अशी सरळ लढत असली, तरी डॉ. आजगावकर यांचा किंचित वरचष्मा दिसून येतो.
15 मध्ये बंडखोरांमुळे काँग्रेस उमेदवार मनोज मसूरकर यांना फटका बसू शकतो असे सांगितले जात असले, तरी आमदार दिगंबर कामत काँग्रेसच येथे बाजी मारेल असे सांगत आहेत. दुसरीकडे स्वतंत्र उमेदवार महेश आमोणकर हे विजयाचा दावा करत असून व्हायबंटचे उदय देसाई यांना काँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्यास फायदा मिळू शकतो. प्रभाग 16 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसत असून दिपाली सावळ येथे बाजी मारण्याची जास्त शक्मयता आहे. तर प्रभाग 17 मध्ये भाजपच्या देविका कारापूरकर व मॉडेल मडगावचे सिद्धांत गडेकर यांच्यात लढत असल्याचे सांगण्यात येते.
प्रभाग 18 मध्ये मॉडेल मडगाव पॅनलचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर, 19 मध्ये लता पेडणेकर व 21 मध्ये दामोदर शिरोडकर हे बाजी मारण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. कारण या प्रभागांमध्ये काँग्रेसला चांगले वातावरण मागील काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे व आमदार कामत यांची मोठी व्होटबँक या भागांमध्ये आहे. 20 मध्ये भाजप व काँग्रेसव्यतिरिक्त शॅडो कौन्सिल व मावळते नगरसेवक जाफर बुदानी यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरविल्याने येथील बहुरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 22 मध्ये भाजपाचे सुनील नाईक व काँग्रेस उमेदवार दामोदर वारक यांना प्रभाग 14 चे माजी नगरसेवक दामोदर नाईक यांनी रिंगणात उतरून चांगली लढत दिल्याने येथे तिरंगी लढतीत कोणाला लॉटरी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कुडतरीतील प्रभागांकडेही लक्ष
कुडतरीतील प्रभाग 23 मध्ये व्हायबंटच्या विवियाना कार्दोज व गोवा फॉरवर्डच्या निमेशिया फालेरो यांच्यातील लढतीत फालेरो यांचा वरचष्मा दिसून येतो. 25 मध्ये फातोर्डा फॉरवर्डच्या आस्मा सय्यद व वायबंटच्या बबिता नाईक यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. 24 मध्ये गोवा फॉरवर्ड व काँग्रेस युतीचा उमेदवार नसून माजी नगरसेवक राजू (हॅडली) शिरोडकर, बायबंटच्या पार्वती पराडकर व अन्य स्वतंत्र उमेदवारांत चांगली टक्कर झाल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. एकंदर स्थिती आज मतपेटय़ा खोलल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.