ओटवणे / प्रतिनिधी:
मळगाव ब्राह्मणआळी जेष्ठ प्रसिध्द भजनी बुवा तथा अष्टपैलू व्यक्तिमत्व चंद्रकांत सदाशिव राणे ऊर्फ आप्पा मासरंणकर (८०) यांचे रविवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्पा राणे हार्मोनियम वादक, गायन, भजन, किर्तन, दशावतार, गायक या सर्व कलांमध्ये माहिर होते. सामाजिक भान असलेल्या आप्पांचा जनसंपर्क मोठा होता. ते एक प्रगतशील शेतकरी तसेच उत्कृष्ट मूर्तिकारही होते. प्रगतशील युवा शेतकरी तथा पशुवैद्यकीय डॉ जगन्नाथ राणे आणि संदेश राणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, भाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.