सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
खानापूर ः नंदगड-नागरगाळी रस्त्यावरील चन्नेवाडी-हलशीदरम्यान मोरीच्या बाजूकडील रस्ता ढासळत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याने या रस्त्यावरून सुरळीतपणे सुरू असलेली नंदगड, हलशी, नागरगाळी वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सध्या खानापूर-रामनगर रस्ता खराब झाल्याने सर्व वाहतूक नंदगड, हलशी, नागरगाळीमार्गे वळविली असल्याने चन्नेवाडीöहलशी मार्गाजवळील रस्ता ढासळत चालला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता हा रस्ता धोकादायक असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने फलक लावून प्रवाशांना जाणीव करून देण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याला विसर पडल्याचे दिसत आहे.
हलशी मार्गावर दररोज खासगी तसेच बस आदी वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता नागरगाळी येथून गोवा, दांडेलीला जातो. या मार्गावरील मोरीजवळील रस्ता पावसाच्या पाण्याने अजून खचण्याची शक्मयता आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची खरी गरज आहे. ढासळलेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच दखल घेतली नाही तर रस्ता पूर्णपणे ढासळण्याचा धोका आहे. त्यामुळे सुरळीतपणे सुरू असलेली या रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची शक्मयता अधिक आहे.