वार्ताहर/ किणये
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बहाद्दरवाडी रस्त्यानजीक शिवारात चक्क एक ट्रक कोसळला. सदर घटना गुरुवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान घडली असून सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.
बेळगावहून बहाद्दरवाडी मार्गे हिंडलग्याला एक ट्रक जात होता. बहाद्दरवाडीच्या वेशीजवळ ट्रक आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. सदर ट्रक थेट शेतात कलंडला. यावेळी ट्रकचालक व वाहक हे ट्रकमधून कसेबसे बाहेर पडले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
बहाद्दरवाडीनजीक रस्ता अरुंद असल्यामुळे सदर ट्रक कोसळला आहे. शेतात ट्रक कोसळल्यामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. सदर ट्रक बाहेर काढण्यासाठी सायंकाळी जेसीबीच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते.