शहापूर पोलिसांची कारवाई : 70 ग्रॅमचे दागिने जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
चोरी प्रकरणी गुरुदेव गल्ली-वडगाव येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. वडगाव) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मंजुनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी, यु. टी. पाटील, एस. एम. कांबळे, एस. एस. उळेगड्डी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
शहापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अलीकडेच झालेल्या दोन चोरी प्रकरणांचा तपास लागला आहे. पोलिसांनी 3 लाख 36 हजार रुपये किमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले आहे. चोरीनंतर दागिने अटवून सोन्याचे तुकडे त्याने आपल्या जवळ ठेवून घेतले होते. त्याचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.