वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी न्यायालयाने राज्य परिवहन संस्थेची बस जप्त केल्याचा प्रकार घडला. 2009 मध्ये बसने रिक्षाला धडक दिल्याने जयश्री शंकर मुधोळ ही महिला मृत झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना 3 लाख 95 हजार रुपये मदत देण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. तरी हा निधी अद्याप जमा करण्यात न आल्याने जमखंडी बस आगारातील बस (क्रमांक केए 29 एफ 1289) एस. जी. हरळय्या यांनी जप्त करून न्यायालय परिसरात उभी केली. अपघातात अन्य 6 जण जखमी झाले होते. अपघातग्रस्त कुटंबातर्फे ऍड. आर. के. नाईक यांनी काम पाहिले.