वृत्तसंस्था / म्युनिच :
बुंदेस्लिगा फुटबॉलमध्ये आघाडीवर असणाऱया बायर्न म्युनिचने दुहेरी मुकुट मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असून आईन्ट्राच प्रँकफर्टचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून त्यांनी जर्मन कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात पुन्हा एकदा लेवान्डोवस्कीने निर्णायक गोल नोंदवला. या सामन्यावेळी दोन्ही संघांनी ‘ब्लॅक लिव्ज मॅटर’ मोहिमेला समर्थन दर्शविले.
इव्हान पेरिसिकने बायर्नला लवकर आघाडी मिळवून दिली. पण उत्तरार्धात डॅनी दा कॉस्टाने प्रँकफर्टला बरोबरी साधून दिली. तो फक्त तीन मिनिटेच मैदानावर होता. मात्र सामना संपण्यास 16 मिनिटे असताना रॉबर्ट लेवान्डोवस्कीने निर्णायक गोल नोंदवून बायर्नला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. त्याचा हा या मोसमातील सर्व स्पर्धांत मिळवून नोंदवलेला 45 वा गोल होता. अंतिम फेरीत बायर्नची लढत बायर लिव्हरकुसेनशी होईल. लिव्हरकुसेनने चतुर्थ विभागीय संघ सारब्रुकेनचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. बर्लिनमधील ऑलिम्पिक स्टेडियमवर 4 जुलै रोजी हा अंतिम सामना होणार आहे.
बायर्न म्युनिचने या आठवडय़ात होणाऱया बुंदेस्लिगामधील सामन्यात बोरुसिया माँचेनग्लाडबाचचा पराभव केला आणि दुसऱया स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंडने फोर्चुना डय़ुसेलडॉर्फकडून पराभव स्वीकारला तर बायर्नचे सलग आठवे जेतेपद निश्चित होईल. मात्र या सामन्यात बायर्नला लेवान्डोवस्की व थॉमस म्युलर यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
येथील सामन्यात 14 व्या मिनिटाला म्युलरने दिलेल्या पासवर पेरिसिकने हेडरवर गोल नोंदवून बायर्नला आघाडीवर नेले. काही क्षणानंतर लेवान्डोवस्कीलाही एक संधी मिळाली होती. पण प्रँकफर्टचा गोलरक्षक केविन ट्रपने शानदार बचाव करीत ती फोल ठरविली. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी टिकविली होती. उत्तरार्धात 66 व्या मिनिटाला प्रँकफर्टने दायची कामादा व डा कॉस्टा यांना बदली खेळाडू म्हणून उतरवले आणि त्यांची ही चाल लगेचच यशस्वी ठरली. कामादाने तीन बचावपटूंना हुलकावणी देत आगेकूच केली आणि गोलच्या समांतर फटका मारला. जवळच असणाऱया डा कॉस्टाने 69 व्या मिनिटाला त्यावर जोरदार फटका लगावत अचूक जाळय़ाची दिशा दिली. त्यानंतर 16 मिनिटे बाकी असताना अल्फोन्सो डेव्हिसने दिलेल्या पासवर लेवान्डोवस्कीने अचूक गोल नोंदवून बायर्नची अंतिम फेरीही निश्चित केली.
या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची त्यांची ही 25 वी वेळ आहे.