निफ्टी 11,300 च्या वर : समभागांचा लिलाव वाढल्याचा प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी बँकांच्या समभाग विक्रीने बाजाराने घसरण नोंदवली होती. परंतु दुसऱया दिवशीच्या सत्रात मंगळवारी मात्र सेन्सेक्स आणि निफ्टीने समाधानकारक कामगिरीची नेंद केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. ही यशाची उंची गाठण्यासाठी बाजाराला जागतिक संकेतामुळे समभागांचा मोठय़ा प्रमाणात लिलाव वाढल्यानेच बीएसईचा सेन्सेक्स 558 अंकांनी तेजीत राहिला आहे.
बाजाराला प्रारंभ झाल्यानंतर बाजाराने 38,000 चा टप्पा गाठला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 558.22 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,492.95 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 168.75 अंकांनी वधारुन 11,300.55 वर स्थिरावला आहे. यात सेन्सेक्सचे फक्त पाच समभागच नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत टीसीएस, कोटक महिंद्रा, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक आणि बजाज ऑटो यांचे समभाग प्रामुख्याने नफ्यात राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र आयसीआयसीआय बँक, नेस्ले, एशियन पेन्ट्स, ओएनजीसी आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
अमेरिकेतील शेअर बाजारातील तेजीमुळे आशिया बाजाराने उल्लेखनीय तेजी प्राप्त केली आहे. विदेशी मुद्रा बाजारात भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 74.84 रुपयावर स्थिर राहिला आहे. खनिज तेल बाजारात ब्रेंड क्रूड तेल 0.07 टक्क्मयांनी घसरुन 43.87 डॉलर प्रति बॅरेलवर राहिली आहे.