देवगड युवक काँग्रेसची मागणीः तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी / देवगड:
संपूर्ण देश कोरोना महामारीने त्रस्त झालेला आहे. अशा महामारीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत होणाऱया जेईई व नेट परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हय़ाबाहेर जावे लागणार आहे. हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी देवगड तालुका युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
देवगड तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांना निवेदन देऊन ही मागणी केंद्र सरकारकडे पाठविण्याची विनंती केली आली. जेईई व नेट परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात केंद्र करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण टेंबुलकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, विलास चव्हाण, दीपक पाडावे, सुशांत कदम, राहुल घाडी, सुरेश देवगडकर, आदित्य आचरेकर आदी उपस्थित होते.