18 वर्षांपूर्वी तुटलेले नाते पुन्हा जुळले
हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेझ आणि अभिनेता बेन अफ्लेक यांनी एंगेजमेंट केली आहे. जेनिफरने स्वतःच्या अधिकृत वेबसाइटवर याची पुष्टी दिली आहे. जेनिफर आणि बेन यांची एंगेजमेंट यापूर्वी तुटली होती. याच्या सुमारे 18 वर्षांनी 2021 मध्ये परस्परांच्या जवळ आल्यावर दोघेही आता विवाहबंधनात अडकण्याची योजना आखत आहेत.
जेनिफरने (52 वर्षे) सर्वप्रथम स्वतःच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर ही घोषणा केली. ज्यानंतर तिने स्वतःच्या निकटवर्तीयांना याच्याशी संबंधित एक ईमेल पाठविला आहे. लोपेझच्या वेबसाइटवर चाहत्यांसाठी शेअर करण्यात आलेल्या संदेशात गायिकेचा एक व्हिडिओ सामील होता, ज्यात एंगेजमेंटच्या हिऱयाच्या अंगठीचे कौतुक करण्यात आले होते.
लोपेझ आणि 49 वर्षीय अफ्लेकने ‘गिगली’ या चित्रपटात एकत्र काम केल्यावर डेटिंग सुरू केले होते. नोव्हेंबर 2002 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती, परंतु लोपेझने 2004 च्या प्रारंभी हे नाते संपुष्टात आणत त्याच वर्षी जून महिन्यात गायक मार्क अँथोनीसोबत विवाह केला होता. त्यानंतर 2014 मध्ये दोघे विभक्त झाले होते. अफ्लेकने देखील 2005 मध्ये अभिनेत्री जेनिफर गार्नरसोबत विवाह केला होता, दोघांनाही 3 मुले आहेत. बेन आणि जेनिफर गार्नर यांच्यात 2018 मध्ये घटस्फोट झाला होता.