ऑनलाईन टीम / इंदौर :
प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर राहत इंदौरी यांचे मंगळवारी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यााने त्यांंची प्राणज्योत मालावली.
दरम्यान, आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती राहत इंदौरी यांनी कालच स्वतः ट्विट करीत दिली होती.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे मी काल कोरोनाची टेस्ट करुन घेतली. त्या टेस्ट चे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो आहे. प्रार्थना करा की, मी लवकरात लवकर या आजाराला हरवेन. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर होते. याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली होती. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली होती.