आबेसिटी अर्थात स्थूलपणा, लठ्ठपणा ही आज जागतिक समस्या बनली आहे. जाडी वाढण्याची अनेक कारणे समोर आली आहेत.
- आहारातील बदल, व्यायामाचा अभाव ही तर जाडी वाढण्याची मुख्य कारणे समजली जातातच. पण अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात झोप कमी मिळणे किंवा अनियमित झोप हेही जाडी वाढण्याचे एक कारण असू शकते असे आढळून आले आहे.
- भूक, पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि मनःस्थिती या सर्वांचेच अनियमित झोपेने खूप नुकसान होत असते.
- पुरेशी झोप घेतली नसेल तर शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. या हार्मोनमुळे भूक लागत असते. परंतु त्याचे पाझरणे विस्कळीत झाल्यामुळे जेवणाचा पॅटर्नही विस्कळीत होतो आणि जेवणातला नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबी जमा व्हायला लागते. झोपेच्या वेळा आणि झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्या प्रक्रिया विचलित होतात आणि परिणामी माणसाला अधिक उष्मांक पुरवणारे अन्न खाण्याची वासना होते आणि त्यामुळे जाडी वाढते.