संघटनेकडून समभागाचे वर्गीकरण
वृत्तसंस्था/ मुंबई
म्युच्युअल फंड्स इंडस्ट्रीज संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (एम्फी)s समभागाचे नवीन वर्गीकरण सादर केले आहे. सदरची नवी यादी फेब्रुवारी ते जुलै 2022 साठी जाहीर झाली असून यामध्ये समावेश असणाऱया स्टार्टअप कंपन्यांमध्ये झोमॅटो, नायका, पेटीएम, पॉलिसी बाजारसह 13 कंपन्यांच्या समभागांना लॉर्जकॅप वर्गवारीत टाकले आहे. तसेच दुसऱया बाजूला बंधन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचाही लार्जकॅपसह मिडकॅप वर्गवारीत समाविष्ट केल्या आहेत.
एम्फीच्या माहितीनुसार जवळपास 20 कंपन्यांना मिडकॅपमधून बाजूला टाकून स्मॉलकॅप वर्गवारीत टाकले आहे. स्मॉलकॅपसह मिडकॅपमध्ये येणाऱया कंपन्यांमध्ये जेएसपीएल, क्लीन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, हॅप्पीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये समावेश आहे.
समभागात येणाऱया फंडवर प्रभाव समभाग वर्गीकरणाचा थेट प्रभाव या समभागांवर दिसणार असून फंड फ्लोवर परिणाम होत असतो. लार्जकॅपमध्ये सर्वाधिक फंड सध्या आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना वर्गीकरणाकडे लक्ष्य देण्याची गरज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.