पहिला प्रकल्प तामिळनाडूत : विदेशातून कर्जही घेण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
मोबाईल फोनसाठी आवश्यक असणाऱया सुटय़ापार्टची आतापर्यंत भारत आयात करत आला आहे. परंतु आगामी काळात देशामध्ये सदरचे सुटेपार्ट तयार करण्यासाठी चालना मिळावी यासाठी विविध टप्प्यावर सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यात आता टाटा सन्सने उडी घेतली आहे.
याचाच एक भाग म्हणून टाटा सन्स तामिळनाडूमध्ये आपला प्रकल्प उभारण्याची योजना आखत असल्याचे समजते. यासाठी विदेशातून 1 अब्ज डॉलर्सपर्यंत कर्ज उभारण्याचीही तयारी कंपनीची असल्याची माहिती आहे. टाटा आपल्या देशातील पहिल्या प्रकल्पामध्ये सर्वात प्रथम आयफोन्सचे पार्ट्स बनविणार असल्याची माहिती आहे.
सध्या विविध मोबाईल कंपन्या चीनमधून बाहेर पडून उत्पादनांसाठी वेगळा पर्याय शोधत आहेत. यामध्ये ऍपलचाही समावेश आहे, अशी माहिती टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी यावेळी दिली आहे.
प्रारंभ आयफोनपासून
टाटा सन्सच्या पूर्ण मालकीची असणारी कंपनी टाटा सन्स पहिल्यांदाच यात अग्रक्रम घेणार आहे. याचा प्रारंभ ती जगातील दिग्गज कंपनी आयफोन कास्टिंगसोबत करणार असून दक्षिण कोरिया तसेच जपानच्या ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चर्स (ओइएम) यांच्यासोबत हातमिळवणी करणार आहे.
प्रकल्पासाठी 1.5 अब्ज डॉलर्स
टाटा समूहाने सदर प्रकल्पासाठी अंतर्गत स्रोतांसह आणि कर्जाद्वारे 1.5 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये 75 कोटी ते एक अब्ज डॉलर्सची रक्कम अन्य आधारे जमा करण्याचे संकेत आहेत.
प्रकल्पासाठी 500 एकर जमीन
तामिळनाडूमधील आपली इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2020ची घोषणा केली आहे. ज्याचे ध्येय 2025 पर्यंत उत्पादन वाढवून 100 अब्ज डॉलर्स करण्याचे आहे. यासाठी होसूर येथे 500 एकर जमीन अधिग्रहण केली आहे.