कोरोनाच्या दुसऱया लाटेला सामोरा जाणाऱया फ्रान्सने 15 डिसेंबर रोजी टाळेबंदी हटविली जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही अत्यंत अवघड काळाला तोंड दिले आहे. स्थिती आता नियंत्रणात येत असताना आम्ही टाळेबंदी हटविण्याची जोखीम पत्करू शकत नाही, असे उद्गार प्रेंच आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी जेरोम सेलोमन यांनी काढले आहेत. फ्रान्समध्ये 6 आठवडय़ांची टाळेबंदी 15 डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
4 आठवडय़ांपूर्वी देशात प्रतिदिन सुमारे 50 हजार रुग्ण सापडत होते. परंतु आता हे प्रमाण 11 हजारांपर्यंत खाली आले आहे. याचमुळे टाळेबंदी लवकर हटविल्यास स्थिती पुन्हा बिघडू शकते असे सरकारचे मानणे आहे