कारचे मोठे नुकसान : पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गावरील घटनाः वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी वाहने अडविल्याने अपघात
प्रतिनिधी / पेडणे
पोरस्कडे येथे रेल्वे पुलाजवळ ट्रकची व्हेगनार कारला धडक बसून दोघे जण जखमी झाले. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
पोरस्कडे येथे रेल्वे पुलाजवळ आज सकाळी 9.30 च्या दराम्यान राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. पेडणे वाहतूक पोलिसांनी गाडय़ा तपासणीसाठी अडविल्याने याठिकाणी दोन्हीही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. या दरम्यान, ओव्हरटेक करणाऱया मालवाहतूक करणाऱया जी.ए. 03 -के-3638 या ट्रकची व समोरून तोरसे येथे जात असलेल्या वारखंड येथील प्रकाश तळवणेकर यांच्या व्हेगनार कार
क्रमांक जीए-03-सी 11 42 या गाडीला धडक बसली. यामध्ये प्रकाश तळवणेकर व त्यांची पत्नी प्रशिला तळवणेकर जखमी झाल्या. तसेच कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
पेडणे वाहतून पोलिसांना वाहने तपासणीसाठी अडविल्याने हा अपघात घडला. यामध्ये तळवणेकर दाम्पत्य सुदैवाने बचावले. त्यांच्या गाडीच्या दर्शनी भागाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. व्हेगनार आपल्या बाजूने असताना पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली, तरीही ट्रक चालकाने चुकीच्या दिशेला जात धडक दिली. या दरम्यान या ठिकाणी पेडणे वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्यावरही ट्रकची धडक बसली असती; मात्र व्हेगानर गाडीमुळे ते सुदैवाने बचावले. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये जखमी झालेल्या प्रकाश तळवणेकर व प्रशिला तळवणेकर यांना तुये येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पेडणे वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची सतावणूक
पेडणे वाहतूक पोलीस विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्मयात वाहन चालकांची सताणूक केली जात असून राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱया गाडय़ांची तपासणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करातात. या प्रकाराला पेडणेतील वाहन चालक त्रस्त झाले आहेत. गाडय़ांची सर्व कागदपत्रे तसेच इतर देस्तावेज असताना विनाकारण या गाडय़ांना राष्ट्रीय महामार्गावर थांबवतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताच्या घटना घडतात. याला वाहतूक पोलीस जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.