काल सापडले 217 नवीन रूग्ण. सर्वाधिक रूग्ण डिचोली मतदारसंघात. सर्वच रूग्ण “होम आयझोलेशन”मध्ये.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील कोरोना रूग्णांची संख्या सध्या झपाटय़ाने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत डिचोली तालुक्मयात एकूण 217 नवीन कोरोनाबाधीत सापडले आहेत. तालुक्मयातील एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 1524 झाली आहे. त्यातील 704 रूग्ण हे डिचोली मतदारसंघातीलच आहेत. गेल्या 24 तासांत केवळ 15 रूग्णांनाच बरे झाल्याने घरी पाठविण्यात आलेले आहे. तर सध्या असलेल्या एकूण 1524 रूग्णांना “होम आयझोलेशन”ची मुभा देण्यात आली आहे. कोवीड निगा केंद्र किंवा कोवीड इस्पितळात तालुक्मयातील एकही रूग्ण दाखल नाही, अशी माहिती मिळाली आहे.
गेल्या 24 तासांत डिचोली मतदारसंघात 136, मये मतदारसंघात 62 तर साखळी मतादरसंघात 19 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डिचोली मतदारसंघातील सक्रिय रूग्णांची संख्या 704, मये मतदारसंघात 433 तर साखळी मतदारसंघात 387 सक्रिय रूग्ण आहेत. मये मतदारसंघातील 15 रूग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे.
डिचोली नगरपालिका क्षेत्रात सध्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. पालिका क्षेत्रातील पाजवाडा, बोर्डे या भागात दरदिवशी नवनवीन रूग्ण आढळून येणे चालूच असल्याने यातील काही भाग मिनी कंटेनमेंट झोन होऊ शकतो. डिचोली मामलेदार, नगरपालिका यांच्या बाजूने त्यादृष्टीने विचारही सुरू झाला आहे. सध्या रूग्ण आढळून येत असलेल्या घरांचा परिसर आणि घरे डिचोली नगरपालिकेतर्फे सेनिटाईझ करणे सुरूच आहे. नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यासह सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागांमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
सरकार आणि नगरपालिकेवर राहण्यापेक्षा स्वतः काळजी घ्या – कुंदन
कोरोना व्हायरस हे अदृश्य संकट असून त्याच्याशी थेट संघर्ष करणे मुश्कलि आहे. त्यासाठी आपण आणि आपल्या कुटुंबाला या व्हायरसचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे हि आपली स्वतःची जबाबदारी आहे. सरकार आणि नगरपालिका लोकांना जागृत करीतच आहे. मात्र काही लोकांमध्ये अद्याप याविषयी गांभीर्य नसल्याने त्याचे त्रास इतरांनाही भोगावे लागत आहे. त्यासाठी प्रत्येकाने या भयानक परिस्थितीत असंवेदनशील राहून चालणार नाही. डिचोली नगरपालिकेतर्फे सध्या आवश्यक ठिकाणी सेनिटायझेशन व इतर प्रकारची जागृती सुरूच आहे. मास्क परिधान न करणाऱयां? विरोधात दंडात्मक कारवाईही चालूच आहे. मात्र लोकांनी आज आपलीव आपल्या कुटुंबाची काळजी हि आपली जबाबदारी असल्याचे ध्यानात ठेवून वावरणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी या परिस्थितीवर व्यक्त केली.
144 कलमाची अंमलबजावणी कठोर व्हावी सध्या लागू करण्यात आलेल्या 144 कलमाची अंमलबजावणी डिचोली शहर व ग्रामीण भागातही कठोरतेने व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. डिचोली शहरात विविध ठिकाणी बेफिकीरपणा पहायला मिळत आहे. पोलिसांनी याविरोधात कठोर होणे गरजेचे आहे. 144 कलमाचा भंग करून घोळक्मयाने गप्पा करणाऱया लोकांवर कारवाई करचे आवश्यक आहे. काही लोक गप्पा करताना तोंडावरील मास्क नाका तोंडाच्या खाली काढून गप्पा मारताना दिसतात. डिचोली बाजारात व.शहरात अनेक ठिकाणी दुकानांवर केरम खेळ खेळला जातो. अनेक केरम प्रेमी बसून खेळतात तर सदर खेळ पाहण्यासाठी अनेकजण उपस्थितही असतात. मात्र सदर खेळणारे न कधी कधी पाहणारेही मास्क योग्य पध्दतीने परिधान केलेले दिसत नाहीत. यावरही कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी डिचोलीतील जागरूक नागरिक करीत आहेत.