ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज प्रकरणी विशेष एनडीपीएस कोर्टाने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला आज जामीन मंजूर केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती. याप्रकरणी काही ड्रग्ज तस्करांसह, रिया आणि शौविकला अटक करण्यात आली होती.
रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 5 सप्टेंबरपासून अटकेत असलेल्या शौविक चक्रवर्तीने 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मुंबईच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
शौविकला ड्रग्ज बाळगणे, खरेदी करणे आणि विक्री करणे अशा गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकले गेले होते. त्यानंतर आज त्याला जामीन मिळाला असूूून शौविकला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.