प्रतिनिधी /बेळगाव
ताशिलदार गल्ली येथे रविवारी दुपारी रस्त्यामधून धूर येवू लागल्याने गोंधळ झाला होता. भूमिगत वीजवाहिनीमधून धूर येत असल्याने हेस्कॉमने तात्काळ वीजपुरवठा बंद केला होता. सोमवारी सकाळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली.
हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी दुकानासाठी वाहिनी घालण्यात आली असल्याचे सांगतिले. याची पाहणी केल्यानंतर वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार झाल्याचे गदगकर यांनी सांगितले. तसेच याचा धोका नसून वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.