दशा महादशा म्हणजे पूर्वजन्मातील पाप-पुण्याचा आरसा
ज्यावेळी एखादा जीव जन्माला येतो त्यावेळी त्याच्या नक्षत्रावरून त्याला कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे ते पाहिले जाते. ज्या ग्रहाची दशा सुरू असेल ती जन्मापूर्वी त्याने किती भोगली असेल व पुढील जन्मात त्याचे परिणाम कसे असतील हे त्यावरून समजते पाप-पुण्याचा हिशोब अत्यंत चोख असतो त्यात कुठेही गफलत होत नाही जन्माच्या वेळी जर चांगली दशा असेल तर त्या माणसाने पूर्वजन्मात काही तरी चांगले कर्म निश्चित केलेले असणार व त्याची उर्वरित जी काही दशा शिल्लक असेल ती या जन्मात देखील त्याला चांगले फळ निश्चित देणार. त्याच न्यायाने जन्मकाली पाप ग्रहांची दशा सुरू असेल तर त्या जीवाने पूर्वजन्मात नक्कीच काहीतरी मोठे पाप केले असणार व त्याचे परिणाम या जन्मात निश्चित भोगावे लागणार असे सांगता येते. एका व्यक्तीला शनि महादशा सुरू होती तिने आपल्या सुनेला मुलगी समजून सर्व काही दिले होते पण सुनेने तिचा बराच छळ केला आणि शेवटी हाल हाल होऊन ती व्यक्ती मरण पावली. त्यावेळी तिने दहा वर्षे शनी महादशा भोगली होती व अजून नऊ वर्षे भोगायची शिल्लक होती पण नियतीचा खेळ इथे संपला नाही त्या सुनेच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्या मुलाला पोलिओ झाला आणि शनी महादशाची उरलेली नऊ वर्षे त्या मुलाला अत्यंत वाईट रीतीने भोगावी लागली सासऱयाने दिलेला सर्व पैसा त्या मुलाच्या आजारपणासाठीच खर्च झाला आणि एवढे करून ते मूल जगले नाही ते नाहीच उलट ती सून भिकेला लागली. तात्पर्य काय तर पूर्वजन्मातील पाप किंवा पुण्य जे काही असेल ते महादशावरून समजते त्यासाठी कोणतीही कुंडली पाहताना वरवर न पाहता अत्यंत सूक्ष्म दशा महादशा देखील विचारात घेणे आवश्यक आहे. मनुष्यप्राण्याच्या जीवनात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडतात त्याची सुरुवातच पूर्वजन्मातील कर्मानुसार महादशेच्या रूपाने दिसत असते. या जन्मात आपल्या आयुष्यात येणाऱया व्यक्ती कुणीही असो त्या व्यक्ती पूर्वजन्मातील शत्रू किंवा मित्र असतात व त्यानुसार ते आपल्याशी चांगले किंवा वाईट वागत असतात. त्यासाठीच शुभंकरोती कल्याणम या मंत्रामध्ये शत्रूबुद्धी विनाशाय असे म्हटले आहे, त्याचा अर्थ अतिशय गहन आहे कुणाच्याही मनात शत्रूबुद्धी राहू नये असा त्याचा अर्थ आहे.
मेष
26 रोजी बुध षष्ठात आहे सर्व कामात यश मिळेल मानसन्मान आणि मानसिक समाधान लाभेल आर्थिक प्राप्तीचे मान वाढते राहील शत्रु थंड पडतील जिथे जाल तिथे विजय प्राप्त कराल या चांगल्या ग्रहमानाचा उपयोग करून घेतल्यास नेत्रदीपक यश मिळेल ज्या क्षेत्रात असाल तेथे चांगले काम करा तुमचे नांव नक्की होईल तसेच काही जणांना नवे पेटंट किंवा नवी कंत्राटे देखील मिळू शकतील तुमच्यातील कलागुणांना ओळखून ते जनतेसमोर सादर करण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ
पंचमस्थानी बलवान बुध म्हणजे विष्णूची कृपा म्हणता येईल शैक्षणिक व्यवसाय पत्रकारिता संपादक प्रकाशक तसेच कर्मकांड करणारी, मंत्रतंत्र, वैद्यक या क्षेत्राशी संबंध असेल तर अतिशय छान काळ आहे बुधाच्या कृपेमुळे मानसिक समाधान मिळेल जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यातून योग्य मार्गाने बाहेर पडाल जर तुमच्या मूळ पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग असतील तर या काळात लॉटरी मटका सट्टा बाजार शेअर मार्केट या क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात धनलाभ होऊ शकेल.
मिथुन
राशीस्वामी बुध बलवान आहे. तुमच्या योग्य असल्याने अनेकांचे जीवन उजळून निघेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल कुटुंबावर जर काही संकट आले असेल तर त्यातून सहीसलामत सुटका होईल लक्ष्मीची कृपा होण्याचे योग. बेकारांना नोकरी मिळेल उद्योगधंदा थंड पडला असेल तर त्याला पुन्हा उभारी येईल तुमचे कर्तृत्व उत्तमच आहे कार्यक्षमता नावाजलेली आहे त्याला जरा योग्य नियोजनाची जोड दिल्यास फार मोठे यश मिळवू शकाल.
कर्क
तृतीयस्थानी प्रभावी बुधाचे आगमन म्हणजे व्यवसायात मोठे यश मिळणार व अंगीकृत कार्यात कोणतीही अडचणी न येता ते काम पूर्ण होणार याचे लक्षण आहे कोणताही नवीन व्यवसाय व उद्योगधंदा केल्यास उत्तम चालेल लिखाणाशी संबंध असेल तर नावलौकिक होईल न्यायालयाशी संबंधित असाल तर तुमच्या प्रामाणिक पणाची सर्वत्र प्रशंसा होईल त्याचा फायदा तुमच्या व्यवसायावर होईल आणि नवनवीन कामे मिळत राहतील.
सिंह
धनस्थानी बलवान बुधाच आगमन झाले आहे आर्थिक स्थिती सुधारेल हातून अनेक महत्त्वाची मोठी कामे होतील. जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. बौद्धिक क्षेत्रातून धनलाभाचे योग शत्रूंच्या कारवाया आपोआप कमी होऊ लागतील कमिशन एजंट क्लार्क, साहित्यिक, ज्योतिषी, प्रकाशक, संपादक पुस्तक विपेते यांना भरभराटीचा काळ. राशीस्वामी देखील बलवान आहे त्यामुळे जेथे जाल तेथे मानसन्मान प्राप्त कराल.
कन्या
राशी स्वामी बुध स्वतःच्या राशीतच आहे. कोणत्याही समस्येवर हा योग निश्चित मार्ग काढत असतो. कोणत्याही क्षेत्रात असाल तरी त्यात उत्तम यश मिळवाल. बुधाच्या या कालखंडात जर पैसा मिळत असेल तर तो राखून ठेवा. त्यात वाढ होत जाईल. गायन व संगीत क्षेत्रात नावलौकिक त्वचारोग, आम्लपित्त असतील तर त्यावर कुठून तरी योग्य उपचार सापडण्याची शक्मयता. नोकरीच्या शोधात असणाऱयांना नोकरी मिळेल. तसेच उद्योग असणाऱयांना मोठय़ा धनलाभाच्या संधी.
तूळ
बुधाचे बाराव्यास्थानी आगमन झालेले आहे. प्रति÷ा वाढेल. धनदौलत समृद्धी आणि कौटुंबिक सुखसमाधान राहील. तुमच्यामुळे सासरच्या घरी समृद्धी येईल. जर कुणी अघोरी प्रकार करीत असतील तर ते यापुढे कमी होऊ लागतील. घरी शुभ कार्य होतील. तसेच इतरत्र कुठेही मंगलकार्य होत असेल तर त्यात हौसेने भाग घ्याल. व्यावसायिकदृष्टय़ा ग्रहमान उत्तम आहे. गुरूचे पाठबळ चांगले असल्याने विवाहसंदर्भातील कोणतीही कामे करण्यास हरकत नाही.
वृश्चिक
लाभस्थानी बलवान बुध आहे त्यामुळे कितीही अवघड आर्थिक समस्या असल्या तरी त्या मिटतील. जर पूर्वी कुठे गुंतवणूक केलेला असाल तर त्याचा. परतावा मिळू लागेल सर्व कार्यात उत्साहाने भाग घ्याल कितीही गंभीर परिस्थिती आली तरी त्यातून योग्य मार्ग काढण्याची कला आत्मसात होईल शिक्षक, अकौंटंट पुरोहितवर्ग,मंगलकार्य चालवणारे चित्रकार कलाकार यांना उत्तम काळ. विवाहासाठी प्रयत्न करीत असाल तर खानदानी घराण्याशी विवाह जुळेल.
धनु
दशमस्थानी बलवान बुध असल्याने महत्त्वाच्या कागदपत्र व्यवहारात यश मिळेल. बंदुका, जंबिया व तत्सम संबंधित व्यावसायिकांना उत्तम काळ. लक्ष्मीची कृपा लावणारे ग्रहमान असल्याने तुमची परिस्थिती कशीही असली तरी अशा बाबतीत भरभराट सुरू होईल.उसनवार रक्कम दिलेली असेल तर ती परत मिळेल. नोकरी-व्यवसायात चांगल्या कामाचे ऑफर येतील. कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंदी राहील.
मकर
भाग्यस्थानी बलवान बुध असल्याने शिक्षणात चांगले यश मिळेल. हाती सतत पैसा खेळता राहील.स्वतःच्या विविधतेमुळे सर्वत्र मानसन्मान प्राप्त कराल घराण्याच्या परंपरा अथवा कुलाचार पाळत असाल तर सर्व कार्यात यश मिळू शकेल. या आठवडय़ात संगीत क्षेत्राशी संबंधित वस्तू खरेदी करण्याचा योग काहीजणांना टीव्हीवरील स्पर्धेसाठी निमंत्रण येण्याची शक्मयता मुलाबाळांच्या बाबतीत मात्र जरा सावध राहावे लागेल.
कुंभ
अष्टमस्थानी बुध आहे कुणाच्या तरी चुकीमुळे आलेले आरोप कमी होतील नोकरी व्यवसाय बंद पडला असेल तर तो पुन्हा सुरू होईल. अंतर्गत हेवेदावे आणि राजकारणामुळे जर नोकरी सुटली असेल तर मालक वर्गाला पश्चाताप होईल आणि ती तुम्हाला परत कामावर येण्याची गळ घालतील. वेतनवाढीच्या दृष्टीने तुम्हाला चांगली संधी आहे. जर योग्य मुद्देसूद व प्रमाणबद्ध वाटाघाटी केल्यास सर्व काही तुमच्या मनासारखे होईल.
मीन
सप्तम स्थानी बलवान बुध आहे. पती अथवा पत्नीनी परस्परांच्या सल्ल्यांचा आदर करून त्याचा व्यवहारात वापर केल्यास कितीही अवघड समस्या असली तरी त्यातून निश्चितच मार्ग निघेल. काही वेळा आपल्या बुद्धीच्या क्षमतेबाहेर काम करण्याची जबाबदारी पडेल. दुसऱयासाठी झटणारी व्यक्ती म्हणून तुमचा नावलौकिक होईल. व्यापार-उद्योगात अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होतील. कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर त्यात यशस्वी व्हाल.