ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या सोशल मीडियावर 1800 रुपयांच्या पैशांवरून एका घरकाम करणाऱ्या काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरूवातीला हा व्हिडिओ मजेशीर वाटला तरीही महिलांचा साक्षरतेचा प्रश्न यातून समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रिया या सामाजिक घटकातील महत्वाचा भाग आहे. पण या स्त्रियांच्या अशिक्षितपणामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचे पुढे आले आहे.
याबाबत महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी ट्विट केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणल्या की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये, असे म्हटले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत, असेही स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, या व्हिडिओवरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.