ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातून सलग चौथ्या दिवशी दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 15,575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 11 लाख 96 हजार 441 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 81.13 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 13, 395 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 लाख 93 हजार 884 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 41 हजार 946 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी दिवसभरात 358 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 39 हजार 430 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.64 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 74 लाख 04 हजार 231 नमुन्यांपैकी 20.18 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22 लाख 84 हजार 204 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 25 हजार 321 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.