- मागील 24 तासात 124 नवे रुग्ण; 7 जणांचा मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात केवळ 124 नवे रुग्ण आढळून आले असून 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 124 दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या कमी आली आहे. यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी 94 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर या संख्येत सतत वाढ होताना दिसून आले होते.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 398 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 32 हजार 292 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 05 हजार 287 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.17 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,914 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्य स्थितीत 2 हजार 091 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 07 लाख 74 हजार 671 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 52,790 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,880 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 4,752 झोन आहेत.
- आतापर्यंत 65 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 86,131 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 60,443 जणांना पहिला डोस तर 25,688 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 65 लाख 10 हजार 297 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 49, 32,224 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 15,78,073 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.